मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२६

वाटाणा लागवडकशी करावी आणि काढणी कधी व कशी करावी याचीसविस्तर माहिती

 शेतकरी बांधवांनो वाटाणा हे थंड हवामानातील पिक असुन या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणुन केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासुन भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. वाटाण्याचे दाणे हवाबंद करून गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवुन त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या अख्या वाटाण्याचा उपयोग भाजी साठी करता येतो. वाटाण्या मध्ये कार्बोदके प्रथिने तसेच फाॅस्फरस ,पोटॅशियम,मॅग्नेशियम ही खनिजे आणि अ ' व 'क' जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. 

हवामान: वाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. सरासरी तापमान १० ते १८ अंश सेल्सिअस असल्यास पिकाची वाढ चागली होते. फुले येण्याच्या काळात उष्ण व कोरडे हवामान असल्यास शेंगा भरत नाही. 

जमीन: वाटाणा पिक सर्व प्रकारच्या जमीनीत घेता येते असले तरी हलक्या जमीनीत पीक लवकर तयार होते. तर मध्यम भारी परंतु भुसभूशीत जमीनीत पिक तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. मात्र या जमीनीत उत्पादन चांगले मिळते. वाटाण्याच्या पिकांसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी भुसभूशीत कसदार रेतीमिश्रित आणि ५.५ ते ६.७ सामु असलेली जमीन निवडावी. 

पुर्व मशागत: वाटाणा हे पिक चांगले उत्पादन क्षम असल्याने त्याची पुर्वमशागत योग्य रितीने करून जमीन चागली भुसभूशीत करावी. त्यामुळे मुळ्या चांगल्या वाढतात आणि भरपूर अन्नद्रव्ये शोषून घेवून झाडाची वाढ व्यवस्थित करण्यास हातभार लावतात. त्यासाठी उभी आडवी नांगरट करून दोन तीन कुळव्याच्या पाळ्या द्याव्यात ढेकळे व्यवस्थित फोडावीत व जमीन सपाट करावी. पेरणी पुर्वी पाणी देणे आवश्यक आहे. वाफसा आल्यावर पेरणी केल्यास उगवण चागली होते. 

 हवामान आणि लागवड हंगाम :

वटाणा हे प्रामुख्याने थंड हवामानात येणारे पीक आहे.

रब्बी हंगाम (मुख्य वेळ): वटाण्याची लागवड प्रामुख्याने १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात केली जाते. या काळात हवामानातील गारवा पिकाच्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी अत्यंत उत्तम असतो.

खरीप हंगाम: काही भागात जेथे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हवामान थंड किंवा मध्यम असते, तेथे लवकर येणाऱ्या जातींची पेरणी केली जाते. मात्र, रब्बी हंगामात सर्वाधिक उत्पादन मिळते.

 सुधारित जाती:

कालावधीनुसार वटाण्याच्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या जाती आहेत

लवकर येणाऱ्या जाती (६० ते ७० दिवस): अर्केल  असौजी, जवाहर मटर-३, आणि फुले प्रिया.

उशिरा येणाऱ्या / मुख्य हंगामातील जाती (८५ ते ११० दिवस): बोनव्हिला जवाहर मटर-१, आणि जबलपूर सिलेक्शन.

खत व्यवस्थापन :

वटाणा हे द्विदल वर्गातील पीक असल्याने ते हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिर करते, त्यामुळे याला नत्राची कमी गरज भासते.

सेंद्रिय खत: प्रति एकरी ४ ते ५ टन चांगले कुजलेले शेणखत पांगवून जमीन तयार करताना टाकावे.

रासायनिक खत (प्रति एकर): पेरणीच्या वेळी १५ किलो नत्र ३० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.

बीजप्रक्रिया: पेरणीपूर्वी बियाणाला 'रायझोबियम' आणि 'पी.एस.बी.' या जीवाणू संवर्धकाची (२५ ग्रॅम प्रति किलो बियाणे) बीजप्रक्रिया केल्यास खतांची कार्यक्षमता वाढते.

पाणी व्यवस्थापन :

वटाणा पिकाला जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकाच्या आयुष्यात खालील दोन टप्पे पाणी देण्यासाठी अत्यंत संवेदनशील असतात, या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये:

फूल लागण्याचा काळ (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी)

शेंगांमध्ये दाणे भरण्याचा काळ (पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी)

शक्य असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा, कारण जास्त पाणी साचल्यास मूळकुजव्या रोग होतो.

. रोग आणि कीड व्यवस्थापन:

मुख्य रोग:

भुशी रोग: पानांवर आणि शेंगांवर पांढरट रंगाची पावडर जमा होते.

उपाय: रोग दिसताच पाण्यात विरघळणारे गंधक (८०% WP) २.५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

मर रोग / मूळकुजव्या: अति पाण्यामुळे किंवा बुरशीमुळे झाडे सुकतात आणि मरतात.

उपाय: पेरणीपूर्वी ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी आणि जमिनीत पाणी साठू देऊ नये.

मुख्य कीड:

पानावरील माशी आणि मावा : या किडी पानांतील रस शोषतात.

उपाय: प्रादुर्भाव जास्त असल्यास डायमेथोएट (३०% EC) २ मिली प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेंगा पोखरणारी अळी : अळी शेंगांना छिद्र करून आतील दाणे खाते.

उपाय: फुलोऱ्यात असताना आणि शेंगा धरताना निंबोळी अर्काची (५%) किंवा इमामेक्टिन बेंझोएट (०.५ ग्रॅम प्रति लीटर) फवारणी करावी.

काढाणी: जातीनुसार वाटाण्याच्या शेंगाची काढणी ६० ते ८० दिवसात सुरू होते. शेंगा काढणीस तयार झाल्या म्हणजे त्याचा गडद हिरवा रंग बदलतो व फिकट हिरव्या टपोरी दिसु लागतात. अशा योग्य झालेल्या शेंगा नियमित तोडाव्यात.शेंगा तोडताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. तोडणी लाबल्यास शेंगाची चव बदलुन प्रत खालावते.परिणामी त्याला भाव कमी मिळुन नुकसान होते. तोडणी शक्यतो सकाळी अथवा संध्याकाळी करावी. शेंगा ची काढणी तीन ते चार तोड्यात पुर्ण होते. तोडणी चा हंगाम दोन ते चार आठवड्या पर्यंत चालतो.                                                               प्रक्रिया करून डबाबंद करण्यात येणारे वाटाण्याचे दाणे एकसारखे भरलेले पण कोवळे हिरवे असणे जरूरीचे असते. 

उत्पादन: लवकर येणार्या जाती चे हिरव्या शेंगाचे हेक्टरी उत्पादन २५  ते ३५ क्विंटल तर मध्यम कालावधीत तयार होणार्या जातीचे उत्पादन ६५ ते  ७५ क्विंटल आणि उशिरा येणार्या जाती चे उत्पादन ८५ ते ११० क्विंटल येते. शेंगातील दाण्याचे प्रमाण ४० ते ४५ टक्के आसते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनो आयात शुल्क मुदतवाढीमुळे कापसाचे भाव कोसळणार की वाढणार?

 शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्कमुक्तीला अजून तरी अधिकृतपणे लेखी मुदतवाढ दिलेली नाही, पण वस्त्रोद्योगाच्या मागणीनंतर स...