शेतकरी बांधवांनो रब्बी हंगामात मधु मका (स्वीट कॉर्न) लागवड करणे खुप फायदेशीर ठरले जाते, कारण या काळात पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो आणि कणसांची गुणवत्ताही चांगल्या प्रकारे मिळते.
१. लागवडीचा योग्य कालावधी :
रब्बी मधु मक्याची पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी. या कालावधीत हवामान थंड होऊ लागल्याने मक्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जास्त उशीर केल्यावर थंडीमुळे उगवण क्षमता आणि पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
२. जमीन व पूर्वमशागत :
जमीन: मधु मकासाठी जमीन मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि सेंद्रिय पदार्थयुक्त जमीन उत्तम असते. नदीकाठची गाळाची जमीन यासाठी अत्यंत सुपीक ठरते. चोपण, अति-आम्ल किंवा क्षारयुक्त आणि दलदलीची जमीन लागवडीसाठी निवडु नाही. जमिनाचा सामू (pH) ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
मशागत: जमिनीची १५-२० सेमी खोल नांगरी करून घ्यावी त्या नंतर २ ते ३ वेळा कुळवाच्या पाळ्या करून द्याव्यात. शेवटच्या पाळीच्या वेळी एकरी ४ ते ५ टन चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत टाकुन मिसळून घ्यावे.
३. खत व्यवस्थापन :
मका हे असे पिक आहे.जे अन्नद्रव्ये वेगाने शोषून घेणारे (खादाड) असल्याने याला संतुलित खतांची गरज असते. एकरी सर्वसाधारण खत मात्रा खालील प्रमाणे विभागून द्यावी:
पेरणीच्या वेळेस (पायाभूत मात्रा): संपूर्ण स्फुरद (Phosphorus), पालाश (Potassium) आणि एकूण नत्राचा (Nitrogen) १/४ भाग द्यावा.
रासायनिक खते: १ बॅग डीएपी (18:46:00) + २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) + १० किलो झिंक सल्फेट (झिंकच्या कमतरतेमुळे मका पिकाची वाढ खुंटते).
पेरणी करून घेतल्यानंतर ३० दिवसांनी (गुडघाभर उंचीवर): एकरी ३० किलो युरिया द्यावा.
पेरणी होऊन ४५ ते ५० दिवसांनी (मकाला तुरा येण्याच्या वेळी): परत एकदा एकरी ३० किलो युरिया द्यावा.
४. रोग आणि कीड व्यवस्थापन :
प्रमुख रोग:
तांबेरा आणि करपा : पानांवर लांबट गोल, भुरकट रंगाचे डाग येतात.
उपाय: पेरणीपूर्वी बियाणांची २ ते २.५ ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डाझिम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करून घ्यावी. प्रादुर्भाव दिसल्यास मॅन्कोझेब (२.५ ग्रॅम/लिटर) किंवा टेब्युकोनॅझोलची फवारणी करावी.
डाउनी मिल्ड्यू (केवडा): पानांवर पिवळसर पांढऱ्या पट्ट्या दिसु लागतात.
उपाय: मेटॅलॅक्झिल या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया आणि फवारणी करून घ्यावी.
प्रमुख कीड:
लष्करी अळी : ही मका पिका वरील सर्वात घातक कीड आहे. ही अळी मक्याचे पोंगे आणि पाने करवडून खाते.
उपाय: पिकाच्या सुरुवातीच्या काळात निंबोळी अर्काची (५%) फवारणी करून घ्यावी. प्रादुर्भाव वाढल्यास एमामेक्टिन बेंझोएट (०.५ ग्रॅम प्रति लिटर) किंवा स्पिनेटोरम या कीटकनाशकाची पोंग्यामध्ये जाईल अशी फवारणी करून घ्यावी.
खोड किडा : अळी खोडात छिद्र करून आतला भाग पोखरून खाते, ज्यामुळे मुख्य पोंगा वाळुन जातो.
उपाय: पेरणी झाल्या नंतर १५ ते २० दिवसांनी कार्बोफ्युरॉन (३ जी) दाणेदार कीटकनाशक प्रति झाड २-३ दाणे याप्रमाणे पोंग्यात टाकावे.
महाराष्ट्रात रब्बी हंगामात लागवडीसाठी आणि बाजारात व्यापाऱ्यांकडून जास्त प्रमाणात मागणी असलेल्या मधु मक्याच्या (स्वीट कॉर्न) टॉप ४ संकरित जाती खालील प्रमाणे आहेत. या जाती कमी कालावधीत जास्त उत्पादन आणि उत्तम गोडवा देतात:
१. शुगर ७५ (Syngenta)
वैशिष्ट्ये: ही महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग मध्ये आणि व्यापाऱ्यांची सर्वात लोकप्रिय आणि खात्रीची जात आहे.
कालावधी: ७५ ते ८० दिवसा मध्ये कणीस काढणीसाठी तयार होते.
फायदे: या जातीचे कणीस आकाराने मोठे (८ ते ८.५ इंच) असते आणि शेवटच्या टोकापर्यंत दाणे गच्च भरलेले असतात. दाणे आकर्षक पिवळसर रंगाचे आणि अत्यंत गोड असतात, ज्यामुळे बाजारात याला सर्वाधिक भाव आसतो.
२. जॅस्मिन सीपी स्वीट २
वैशिष्ट्ये: ही जात अतिशय वेगाने वाढणारी आणि कमी दिवसात येणारी जात आहे.
कालावधी: ६५ ते ७० दिवसांत काढणीसाठी तयार होते.
फायदे: कमी दिवसात पैसा मिळवून देणारी जात असल्यामुळे रब्बी हंगामात थंडी वाढण्यापूर्वी ही जात काढणीला येऊ शकते. कणीस आकर्षक आणि वजनाला भारी भरत असते.
३. बायोसीड ४०४३
वैशिष्ट्ये: या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आणि झाडांची शारीरिक वाढ अत्यंत मजबूत असते.
कालावधी: ७० ते ७५ दिवस.
फायदे: लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी ही जात सर्वात जास्त चांगली मानली जाते. याचे दाणे रसरशीत आणि गोड असतात आणि बाजारातील मागणीनुसार कणसाचा आकार एकसारखा असतो.
४. मिठास
वैशिष्ट्ये: नावाप्रमाणेच या जातीमध्ये गोडव्याचे प्रमाण चांगले असते.
कालावधी: ७५ ते ८० दिवस.
फायदे: दाण्यांचा रंग गडद सोनेरी पिवळसर असतो. बाजारात किरकोळ विक्रीसाठी आणि घरगुती वापरासाठी या जातीच्या मक्याला ग्राहक जास्त प्रमाणात पसंत करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा