शेतकरी बांधवांनो हलक्या प्रतिच्या बाण्याचा वापर कमी अनुकूल जमीन आणि हवामान अपुरा पाणी पुरवठा किड व रोग इत्यादी प्रमुख कारणांमुळे महाराष्ट्रात बटाटा उत्पादन कमी होते. बटाट्याच्या पिकाची लागवड देशामध्ये अनेक राज्यांत प्रमुख्याने रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या केली जाते महाराष्ट्रात खरीप व रब्बी हंगामात बटाटा लागवड केली जाते त्यामुळे उत्तर भारतात जेव्हा बटाटा पिक नसते तेव्हा नवा बटाटा महाराष्ट्रात उपलब्ध असतो भाव चागंला येतो.
जातीची निवड:
सर्वसाधारणपणे लवकर येणार्या जाती 80 ते 100 दिवस , मध्यम कालावधीत येणार्या जाती 100 ते 120 दिवस व उशिरा येणार्या जाती 120 पावसापेक्षा जास्त कालावधी त येणार्या जाती अशा प्रकारे कालावधी वरून बटाट्याच्या जाती पडल्या आहेत. हिमाचल प्रदेशात कुफरी येथे बटाटा संशोधन केंद्र आहे. या केंद्राने बटाटा पिकांच्या अनेक जाती विकसित केल्या असुन महाराष्ट्रात काही हळव्य व गरव्या जातीची शिफारस केली आहे. त्या जाती पुढे सविस्तर देतं आहोत.
कुफरी चंद्रमुखी ही लवकर येणारी बटाट्याची जात असुन महाराष्ट्रात लागवडी साठी उत्तम आहे. कुफरी हि केवळ 75 ते 80 दिवसात येणारी जात असुन महाराष्ट्रात खरीप व रब्बी हंगामासाठी उत्तम जात आहे. कुफरी सिंधुरी ही उशिरा येणारी मात्र महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी उत्तम जात आहे. कुफरी बादशहा ही उत्तर भारतात चांगले उत्पन्न देणारी जात आहे. याशिवाय कुफरी अलंकार, कुफरी चमत्कार, कुफरी देवा इत्यादी बटाट्याच्या सुधारीत जाती आहेत.
हळव्या जाती:
कुफरी लवकर: हि जात रब्बी व खरीप या दोन्ही हंगामात घेता येते व 75 ते 80 दिवसात या जातीचे बटाटे काढणीस तयार होतात. ही जात दक्षिण पठारी प्रदेशात चागंली येते हेक्टरी उत्पादन 15 ते 19 टन असुन बटाटा आकाराने मोठा गोल व सफेद रंगाचा असतो. साठवणुकीस चागंला राहतो.
कुफरी चंद्रमुखी : झाडे मध्यम उंचीची उभी व जोमदार वाढणारी आसतात. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. पिक 80 ते 90 दिवसात काढणीस तयार होते.उत्पादन 20 ते 25 टन हेक्टरी असुन. बटाटे आकर्षक पांढर्या रंगाचे असतात. या जातीचे बटाटे लवकर शिजतात व गर मळकट पांढरा पाठूख असतो.हे साठवणुकीस उत्तम आहे.
गरव्या जाती:
कुफरी सिंधुरी: या जातीची शिफारस रब्बी हंगामासाठी केली असुन बटाटे आकाराने गोल व फिकट रंगाचे असतात. बटाटे 110 ते 120 दिवसात काढणीस तयार होतात. बटाट्यातील गर फिका व पिवळ्या रंगाचा असुन ही जात माने मुरडणार्या रोगास प्रतिकार करते व करपा या रोगास प्रतिकार करते. याचे उत्पादन हेक्टरी 22 ते 25 टन आहे.
कुफरी बादशहा : हि जात धुक्यात तसेच करपा या रोगास प्रतिकार करते. बटाटे 90 ते 100 दिवसात काढणीस तयार होतात. बटाटा मध्यम मोठ्या आकाराचा असुन पांढरट चमकदार रंगाचा आहे. याचे उत्पादन हेक्टरी 23 ते 26 टन मिळते.
जे एच - 222 : हि बटाट्याची संकरित जात असुन करपा रोगाल प्रतिकारक आहे. बटाटे पांढर्या रंगाचे व लांबोळे असुन या जातीच्या बटाट्याची प्रत साठवणुकीस चागंली राहते. ही जात 1988 मध्ये लागवडी साठी शिफारस करण्यात आली आहे. प्रतिहेक्टरी उत्पादन 22 ते 25 टन मिळते.
हवामान :
बटाटा हे प्रामुख्याने थंड हवामानात येणारे पीक आहे.
तापमान: बटाट्याच्या उगवणीसाठी 25°C, वनस्पतींच्या वाढीसाठी 20°C आणि कंद (बटाटा) पोसण्यासाठी 17°C ते 20°C तापमान उत्तम मानले जाते.
जर तापमान 30°C पेक्षा जास्त वाढले, तर बटाटे तयार होण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो आणि कंद नीट बसत नाहीत.
जमीन निवड :
बटाटा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सुपीक आणि भुसभुशीत (हलकी ते मध्यम पांढरी किंवा वालुकामय-पोयट्याची) जमीन अत्यंत योग्य असते.
जमिनीचा सामा (pH) 6.7 ते 7.5 च्या दरम्यान असावा.
टीप: अत्यंत चोपण, भारी काळी किंवा पाणी साठून राहणारी जमीन बटाट्यासाठी निवडू नये. अशा जमिनीत कंदांचा विकास नीट होत नाही आणि कंद सडण्याचा धोका वाढतो. लागवडीपूर्वी जमीन 2-3 वेळा नांगरून भुसभुशीत करावी आणि भरपूर शेणखत मिसळावे.
लागवडीचा कालावधी:
बटाटा लागवड जर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत केली असता डिसेंबर व जानेवारी तील थंड हवामान जमीनीतील बटाटे पोसण्यास अनुकूल असते म्हणुन या कालावधीत लागवड करणे फायद्याचे ठरते.
पुर्व मशागत:
जमीनीची नांगरणी व वखारणी करून जमीन मोकळी व भुसभूशीत करावी. हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत पसरून घ्यावे. तसेच शेणखता सोबत ऑझाटोबॅक्टर अडीच किलो पी.एस. बी.अडीच किलो ही जीवाणू संवर्धक खते व ट्रायकोडर्मा अडीच किलो ही परोपजीवी बुरशी प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यावे. शक्य असल्यास हिरवळीचे खत म्हणुन तागाचा उपयोग बटाट्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
लागवडीचे अतंर:
बेणे किंवा फोडीची, दोन ओळीतील अंतर 45 ते 60 सेमी व दोन झाडातील अतंर 10 ते 15 सेमी ठेवून तीन ते चार से.मी. खोलीवर लागवड करावी. या प्रमाणे प्रति हेक्टरी 20 ते 25 क्विंटल बेणे लागते.
. खत व्यवस्थापन :
बटाटा हे जमिनीच्या आत वाढणारे पीक असल्याने याला खतांची भरपूर गरज असते . माती परीक्षणाच्या अहवालानुसार खतांचे नियोजन करणे उत्तम ठरते
सेंद्रिय खते: लागवडीपूर्वी शेत तयार करताना प्रति हेक्टरी 15 ते 20 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत व्यवस्थित मिसळावे
रासायनिक खतांची शिफारस (प्रति हेक्टरी): 150 किलो नत्र (N), 60 किलो स्फुरद (P) आणि 120 किलो पालाश (K)
खत देण्याची पद्धत व वेळ:
लागवडीच्या वेळी: नत्राची अर्धी मात्रा (75 किलो) आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा (60 किलो स्फुरद + 120 किलो पालाश) लागवडीच्या वेळी ओळीत द्यावी
लागवडीनंतर (३० दिवसांनी): लागवडीनंतर सुमारे 25 ते 30 दिवसांनी उरलेल्या नत्राची अर्धी मात्रा (75 किलो) द्यावी. या वेळी खुरपणी करून पिकाला मातीची भर (वरंबे चढवणे) द्यावी
पाणी व्यवस्थापन :
बटाटा पिकाची मुळे उथळ असतात, त्यामुळे याला नियमित पण थोडे हलके पाणी लागते. पिकाला एकूण 50 ते 60 सें.मी. पाण्याची गरज असते.
पहिले पाणी (आंबवणी): बटाट्याची लागवड केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. यामुळे बटाट्याचे कोंब जमिनीत कुजत नाही.
दुसरे पाणी: लागवडी नंतर 4 ते 6 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. पाणी देताना वरंबे 2/3 (दोन तृतीयांश) उंचीपर्यंतच भिजतील याची काळजी घ्यावी, वरंबे पूर्ण पाण्यात बुडवू नयेत.
नियमित पाणी पाळ्या: जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि हवामानानुसार साधारणपणे 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
महत्त्वाचा टप्पा (बटाटा पोसण्याचा काळ): लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान जमिनीत बटाटे (कंद) फुगण्यास सुरुवात होते. या काळात पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये, अन्यथा बटाट्याचा आकार लहान राहतो किंवा त्यांना तडे जातात.
काढणीपूर्वी: बटाटा काढणीच्या 10 ते 12 दिवस आधी पाणी देणे पूर्णपणे बंद करावे, ज्यामुळे बटाट्याची साल जाड होते आणि साठवणूक क्षमता वाढते.
रोग व्यवस्थापन आणि उपाय:
करपा रोग :
बटाट्यावर दोन प्रकारचा करपा येतो:
अगेती करपा (Early Blight): पानांवर लंबगोळा, तपकिरी रंगाचे गोल कडे असलेले सारखे) ठिपके पडतात.
पछेती करपा : हा अत्यंत घातक रोग असून दमट हवामानात वेगाने पसरतो. पानांच्या कडा काळ्या पडतात आणि पाने कुजतात.
नियंत्रण:
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मँकोझेब (Mancozeb) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (Copper Oxychloride) 2.5 ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
प्रादुर्भाव जास्त असल्यास मेटॅलॅक्सिल + मँकोझेब (सॅफ/रिडोमिल) 2 ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारावे.
बांगडी रोग किंवा जिवाणूजन्य सड:
लक्षणे: हा जिवाणूजन्य रोग आहे. यामध्ये पाने पिवळी पडून झाड अचानक सुकते (कोमेजते). बटाटा आडवा कापल्यास आतमध्ये तपकिरी रंगाची वर्तुळाकार रेघ (बांगडीसारखी) दिसते आणि दाबल्यास पांढरा पू सारखा द्रव बाहेर येते.
नियंत्रण:
हा मातीतून पसरणारा रोग असल्याने लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
शेतात पाणी साचू देऊ नये, निचरा चांगला असावा.
प्रादुर्भाव दिसल्यास स्ट्रेप्टोसायक्लिन (Streptocycline) 1 ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून झाडाच्या मुळाशी आळवणी (Drenching) करावी.
काळी बुरशी / ब्लॅक स्कर्फ
लक्षणे: बटाट्याच्या सालीवर काळ्या किंवा गडद तपकिरी रंगाचे कडक ठिपके दिसतात. यामुळे बटाट्याचा बाजारातील भाव कमी होतो.
नियंत्रण: लागवडीपूर्वी बटाट्याचे बेणे कार्बेन्डाझिम (Bavistin) किंवा मँकोझेब च्या द्रावणात 10 ते 15 मिनिटे बुडवून मगच लागवड करावी.
विषाणूजन्य रोग - तांबेरा/बोकड्या/मोझॅक)
लक्षणे: पाने आकसतात, लहान राहतात किंवा पिवळी पडतात. झाडाची वाढ खुंटते. हे रोग प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या किडींमुळे होतात.
उपाय: तुडतुड्याच्या बंदोबस्त साठी डायमेथोएट 30 टक्के दहा मिली दहा लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मावा व पांढरी माशी साठी उलाला किंवा पणामा हे कीटकनाशक घ्यावे.
साठवणुक :
बटाटा काढल्यानंतर आठ ते दहा दिवस सावलीत सुकवत ठेवून मुरू द्यावा.त्यामुळे वाहतूक करताना हाताळतांना साल निघत नाही. वेगवेगळी प्रतवारी विभागणी केलेले बटाटे 40 ते 50 किलो वजनाचे पोत्यांत भरावी त व हे बटाटे शितगृहात 2.2 ते 3.3 अंश सेल्सिअस तापमान 75 ते 80 टक्के आद्रता असतांना उत्तम स्थितीत राहु शकतात. साठवणुकीपुर्वी 100 लीटर पाणी 100 ग्रॅम बावीस्टीन व 500 मि.ली. निर्माक या द्रावणात बटाटे पाच मिनिटे बुडवावेत. त्यानंतर सुकवावेत नंतर ठेवावे असे केल्याने बटाटा बराच काळ सुरक्षित राहतो.
उत्पादन:
सलग बटाट्याची लागवड केली असता आपणास हेक्टरी 16 ते 25 टन उत्पादन मिळु शकते. बटाट्याचे उत्पादन बहुतांशी लागवडी चा हंगाम जमीन बेण्याची शुध्दता व जात यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे 150 ते 250 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन होते. काही शंका असल्यास खाली कमेट करून नक्की विचार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा