मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२६

कांदा लागवड पीक संरक्षण प्रकिया तन नियंत्रण साठवणुक कांदा चाळा याची सविस्तर माहिती


 हवामान:

शेतकरी बांधवांनो कांद्याच्या उत्तम वाढीसाठी सुरूवातीला थंड (12.8अंश से.ग्री.ते 21.2 अंश से.ग्रे.) आणि कोरडे हवामान आवश्यक असते. पण कांदा पोसताना उष्ण तापमान आणि दीर्घकाळ सुर्यप्रकाश (सुमारे 10 ते 12 तास) अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हवेतील आर्द्रता 70% पर्यंत असणे आवश्यक आहे. एकसारखा किंवा जास्त पाऊस या पिकास उपायकारक ठरतो. कोरडे हवामान कांदा पिकास पोषक असल्याने कमी आर्द्रता असलेल्या भागात उत्पादन चांगले येते. अति दमट व उष्ण हवामानात करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. उष्ण हवामान व नंतर फार वेळ ढगाळ व दमट हवामान असेल तर रोपं जळतात व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो 

जमीन निवड: 

कांदा लागवडीसाठी मध्यम,भारी,कसदार आणि भुसभूशीत जमीन निवडावी. रोपाच्या मुळाभोवती पुरेसा ओलावा राखून कांद्याच्या वाढीस पुर्ण वाव देणारी जमीन कांद्याच्या लागवडीस चागली असते भारी,चिकन व पाण्याचा निचरा न होणार्या जमीनीत कांद्याची वाढ होत नाही. म्हणुन अशा जमीनीत कांदा लावु नये. कांद्याच्या वाढीसाठी जमीनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 असावा  

लागवडी चा हंगाम: 

महाराष्ट्रातील समशीतोष्ण हवामानात बर्याच ठिकाणी कांद्याची लागवड खरीप (जुन ते ऑक्टोबर) रब्बी (ऑक्टोबर ते जानेवारी) आणि उन्हाळी  (जानेवारी ते जुन) अशा तीन हंगामात कांद्याचे पिक घेतले जाते. नाशिक व पुणे विभागात अनुक्रमे पोळ,रांगडा व उन्हाळी अशा तीनही हंगामात कांद्याचे पिक घेतले जाते. 

     त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे:

1. हंगाम खरीप (पोळ)

 बियाणे पेरणीची वेळ : मे- जुन 

पुनर्लागवड वेळ:

जुलै-ऑगस्ट 

काढणीची वेळ: 

ऑक्टोबर ते डिसेंबर 

जाती: 

अग्रीफाऊंड डार्क रेड, बसवंत ७८०,एन-५३ अरका कल्याण 

2. रांगडा किंवा हळवा 

बियाणे पेरणी वेळ ऑगस्ट ते सप्टेंबर 

पुनर्लागवड वेळ ऑक्टोबर नोव्हेंबर 

काढणीची वेळ जानेवारी मार्च 

जाती अग्रीफाऊंड,लाईट रेड,पुसा रेड,एन २४१ अरका निकेतन 

3. रब्बी (उन्हाळी किंवा गरवा):

बियाणे पेरणी वेळ ऑक्टोबर नोव्हेंबर 

पुनर्लागवड वेळ डिसेंबर जानेवारी 

काढणीची वेळ एप्रिल मे 

जात एन-२५७-९-१  

 जमीन मशागत:

मध्यम भारी जमीन असल्यास लोखंडी नांगराने 15ते 20 से.मी. खोल नागरट करावी. नंतर दोन तीन कुळव्याच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभूशीत करावी. मशागत करीत असताना अगोदरच्या पिकाची धसकटे काडीकचरा असल्यास गोळा करून कंपोस्ट खड्यात टाकावा.हरळी,लव्हाळा यासारख्या तणांचा मुळासकट काढुन जाळून नायनाट करावा. हेक्टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरून कुळवणीव्दारे जमीनीत चांगले मिसळावे. खरीप हंगामात कांदा लागवडी अगोदर वाफसा असताना कुळव्याच्या आडव्या उभ्या पाळ्या देऊन तणांचा नाश करून जमीन मऊ आणि भुसभूशीत करावी. जमीनीचा प्रकार हंगाम आणि पावसाचे प्रमाण यांचा विचार करून निरनिराळ्या भागात सपाट वाफे किंवा सरीवरंबा पध्दतीने कांदा लागवड केली जाते 

कांदा काढणी:

लागवडीनंतर जातीपरत्वे आणि हवामानानुसार कांदा पक्व होऊ लागला की नवीन पाने यायचे थांबते. अन्नरस काद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होऊ लागतो.पाने पिवळसर होऊ लागतात. कांद्याचा मानेचा भाग मऊ होतो व पाने मानेजवळ वाकुन जमिनीवर पडतात. यालाच माना पडणे आसे म्हणतात. साधारण पणे ३०ते ४० टक्के झाडांच्या माना पडल्या की कांदा काढणीला आला असे समजावे रब्बी किंवा उन्हाळी कांद्यामध्ये पक्वतेची वरील लक्षणे ठळकपणे आढळून येतात परंतु खरीप काद्यामध्ये पक्वतेची ही लक्षणे दिसतील च असे नाही. कांदा तयार झाला तरी माना पडतील असे नाही. याचे कारण असे की खरिपाचा कांदा लागवडी नंतर १०० ते ११०दिवसात तयार होतो जुन मध्ये लावलेला कांदा सप्टेंबर महिन्यात काढणीला येतो. यावेळी पाऊस पडत असतो. पाऊस नसला तरी जमीनीत ओलावा भरपुर असतो. ओलावा असल्यामुळे मुळे कार्यरत आसतात.  हवामान अनुकूल असल्यामुळे नवीन पाने येत राहतात. त्यामुळे माना जाड होतात व माना पडत नाहीत. साधारण पणे कांद्याची वाढ व आकारमान बघुन काढणीचा अदांज घ्यावा लागतो. बर्याच वेळा खरिपात जसा भाव असेल त्याप्रमाणे तयार झालेले कांदे विरळुन काढले जातात 

१. कांदा खत व्यवस्थापन 

कांदा पिकाला संतुलित अन्नद्रव्यांची गरज असते. माती परीक्षणानुसार खत देणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. 

सेंद्रिय खते (लागवडीपूर्वी): जमीन तयार करताना हेक्टरी २०-२५ टन चांगले कुजलेले शेणखत आणि सोबतीला २० ते ४५ किलो गंधक  जमिनीत मिसळावे. 

रासायनिक खतांचे प्रमाण (प्रति हेक्टर): सर्वसाधारणपणे १०० किलो नत्र (N), ५० किलो स्फुरद (P), आणि ५० किलो पालाश (K) देण्याची शिफारस आहे.

लागवडीच्या वेळी: नत्राची अर्धी मात्रा (५० किलो) आणि स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा (प्रत्येकी ५० किलो) द्यावी.

लागवडीनंतर ३० दिवसांनी: उरलेली नत्राची अर्धी मात्रा (५० किलो) युरियाद्वारे द्यावी. (नत्र खते लागवडीनंतर ६० दिवसांच्या आतच संपवावीत). 

द्रव्यरूप खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये (फवारणी किंवा ड्रीपद्वारे):

३० व ४५ दिवसांनी: १९:१९:१९ (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) + मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड-२ फवारणी.

६० व ७५ दिवसांनी: १३:००:४५ (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी).

९० दिवसांनी (कंद फुगवणीच्या वेळी): ००:००:५० (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी). 


२. प्रमुख रोग आणि त्यांचे उपाय 

अ) करपा रोग

हा कांद्यावरील सर्वात घातक रोग आहे. यात प्रामुख्याने काळा, जांभळा आणि तपकिरी करपा आढळतो. पानावरील डाग वाढून पाने सुकतात व पिळवटतात. 

उपाय: ढगाळ किंवा दमट हवामान दिसताच प्रतिबंधक उपाय म्हणून मॅन्कोझेब (२.५ ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझिम (२ ग्रॅम) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास प्रोपीकोनॅझोल किंवा हेक्साकोनॅझोल (१ मिली प्रति लिटर) फवारणी करावी. 

ब) रोपवाटिकेतील मर किंवा मूळकूज 

हा बुरशीजन्य रोग नर्सरीमध्ये किंवा मुख्य शेतात रोपे कोलमडण्यास आणि सडण्यास कारणीभूत ठरतो. 

उपाय: लागवडीपूर्वी गादीवाफ्यावर बियाणे टाकताना थायरम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडीची बीजप्रक्रिया करावी. शेतात प्रादुर्भाव आढळल्यास कार्बेन्डाझिम किंवा कॅप्टन (२ ग्रॅम प्रति लिटर) च्या द्रावणाची झाडांच्या मुळाशी आळवणी  करावी. 

क) थ्रिप्स किंवा फुलकिडे 

हा कीटक पानामधील रस शोषून घेतो, ज्यामुळे पानांवर पांढरट चट्टे पडतात आणि पाने वाकडी होतात. या किडीमुळे 'आयरिश यलो स्पॉट' हा व्हायरसदेखील पसरतो. 

उपाय: शेताभोवती मक्याचे कुंपण पेरल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो. रासायनिक नियंत्रणासाठी कार्बोसल्फान (२ मिली प्रति लिटर) किंवा फिप्रोनिल (१.५ मिली प्रति लिटर) पाण्यामध्ये चांगल्या दर्जाचे स्टीकर (१ मिली) मिसळून फवारणी करावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनो आयात शुल्क मुदतवाढीमुळे कापसाचे भाव कोसळणार की वाढणार?

 शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्कमुक्तीला अजून तरी अधिकृतपणे लेखी मुदतवाढ दिलेली नाही, पण वस्त्रोद्योगाच्या मागणीनंतर स...